सावंतवाडी । प्रतिनिधी
माजी मुख्यमंत्री , खासदार नारायण राणे यांची माजी राज्यमंत्री प्रवीण भोसले यांनी काल मुंबई येथील निवासस्थानी भेट घेतली. या भेटीत मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल आणि दोडामार्ग एमआयडीसी बाबत चर्चा झाल्याचे श्री भोसले यांनी सांगितले. या भेटीत प्रवीण भोसले यांनी सावंतवाडीतील मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल जनतेला आरोग्य सेवा देण्यासाठी लवकर कार्यरत होण्याबाबत खासदार नारायण राणे यांनी विशेष लक्ष द्यावे अशी विनंती केली. दोडामार्ग येथील एमआयडीसीत आणखीन जमीन घेऊन तेथे हॉस्पिटल साठी लागणारी मशिनरी निर्माण करण्याचा प्रकल्प उभा करून सिंधुदुर्गातील हजारो तरुणांना नोकऱ्या मिळतील असा विश्वास खासदार राणे यांनी व्यक्त केल्याचेही माजी राज्यमंत्री भोसले यांनी यावेळी सांगितले. यावेळी सतीश सुराणा व संतोष कोठारी उपस्थित होते.









