प्रतिनिधी/ बेंगळूर
करचुकवेगिरीच्या पार्श्वभूमीवर बेंगळूर, म्हैसूर, मंड्यासह राज्यातील 30 हून अधिक ठिकाणी प्राप्तिकर विभागाच्या अधिकाऱ्यांनी बुधवारी सकाळी छापे टाकले. कर चुकविल्याच्या आरोपावरून उद्योजक, बिल्डरांची निवासस्थाने व कार्यालयांवर एकाच वेळी छापे टाकून क्यवहाराची कागदपत्रे ताब्यात घेण्यात आली आहेत.
सरकारच्या विविध कामांचे कंत्राट मिळविलेल्या रामकृष्ण यांच्या म्हैसूरमध्ये निवासस्थानासह कार्यालयावर प्राप्तिकर अधिकाऱ्यांनी धाड टाकली. तीन कारमधून आलेल्या 30 हून अधिक अधिकाऱ्यांनी रामकृष्ण यांच्या निवासस्थानी व कार्यालयात तपासणी केली. रामकृष्ण यांच्या एमप्रो पॅलेस, हॉटेल, कल्याण मंटपसह इतर ठिकाणीही छापे टाकण्यात आले.









