ऑनलाईन टीम / तरुण भारत :
राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या पत्नी प्रतिभा पवार यांना मुंबईच्या ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. प्रतिभा पवार यांच्यावर शस्त्रक्रिया करण्यात येणार असून, शरद पवार रुग्णालयात पोहोचले आहेत. एएनआय वृत्तसंस्थेने यासंदर्भात ट्विट केले असून, पवार कुटुंबियांकडून शस्त्रक्रियेसंदर्भात कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही.
Maharashtra | NCP chief Sharad Pawar's wife Pratibha Pawar admitted to Mumbai's Breach Candy Hospital: She will undergo surgery at Breach Candy Hospital, NCP President Sharad Pawar has reached the hospital: NCP
— ANI (@ANI) July 14, 2023