सावंतवाडी प्रतिनिधी
भाजपच्या प्रदेश युवा मोर्चा उपाध्यक्षपदी प्रथमेश राजन तेली यांची नियुक्ती प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली आहे. माजी आमदार राजन तेली यांचे सुपुत्र असलेले प्रथमेश तेली यांच्यावर युवा मोर्चाच्या प्रदेश उपाध्यक्ष पदाची धुरा सोपवण्यात आली आहे . श्री प्रथमेश तेली हे गेल्या पाच वर्षांपासून राजकारणात सक्रिय आहेत. सावंतवाडी मतदारसंघात त्यांचा विशेष लक्ष आहे. त्यांच्यावर आता प्रदेश उपाध्यक्ष युवा मोर्चाची जबाबदारी सोपवण्यात आल्याने युवकांची फळी मजबूत करण्याकडे त्यांचा अधिक लक्ष असणार आहे. त्यांच्या निवडीबद्दल सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.









