धारवाडचा रमेश अंबिगार उपविजेता
बेळगाव : कर्नाटक राज्य शरीरसौष्ठव संघटना व दावणगिरी जिल्हा शरीरसौष्ठव संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने हरिहर येथील मि. फॉरेव्हर क्लासिक राज्यस्तरीय शरीरसौष्ठव स्पर्धेत बेळगावच्या प्रताप कालकुंद्रीकरने आपल्या पिळदार शरीराच्या जोरावर मि. फॉरेव्हर क्लासिक हा मानाचा किताब पटकाविला तर धारवाडच्या रमेश अंबिगारला पहिल्या उपविजेपेपदावर समाधान मानावे लागले. हरिहर येथे घेण्यात आलेल्या राज्यस्तरीय शरीरसौष्ठव स्पर्धेत आयबीबीएफ मुंबईच्या नियमानुसार सात वजनी गटात ही स्पर्धा घेण्यात आली. 55 किलो वजनी गटात : 1) ऋतिक लाखे (बेळगाव) 2) सतीश एस. (धारवाड) 3) सलमान खान (शिमोगा) 4) मंजुनाथ हुबळीकर (धारवाड) 4) मुरारी पटेल (शिमोगा). 60 किलो वजनी गट : 1) संजय के. (दावणगिरी) 2) अतिक किल्लेदार (बेळगाव) 3) सिद्धेश जी. (दावणगिरी) 4) दर्शन जी. (चित्रदुर्ग) 5) नितेश गोरल (बेळगाव). 65 किलो वजनी गट : 1) आकाश आर. (शिमोगा) 2) मंजुनाथ बी. (चित्रदुर्ग) 3) चंदनकुमार (धारवाड) 4) गजानन एम. (दावणगिरी) 5) शोहेब बेडगिरी (धारवाड). 70 किलो वजनी गट : 1) रमेश अंबिगार (धारवाड) 2) लोकेश पटेल (शिमोगा) 3) सुरेश लमानी (धारवाड) 4) फैजल हुनगुंद (धारवाड) 5) अप्पू जमालकट्टी (बेळगाव). 75 किलो वजनी गट : 1) प्रताप कालकुंद्रीकर (बेळगाव) 2) तापसकुमार नायक (चित्रदुर्ग) 3) अफ्रोझ ताशिलदार (बेळगाव) 4) राहुल के. (बेळगाव) 5) नवीन होसमणी (धारवाड). 80 किलो वजनी गट : 1) रझाक अहमद खान (धारवाड) 2) विजय पी. (धारवाड) 3) युसुब आयबी (दावणगिरी) 4) रवी गाडीव•र (बेळगाव) 5) प्रशांत पाटील (बेळगाव). 80 किलो वरील वजनी गट : 1) वरुणकुमार जेव्हीके (दावणगिरी) 2) महेश गवळी (बेळगाव) 3) विक्रम सातवणेकर (बेळगाव) 4) सुदीप शिंदे (बेळगाव) 5) काशिनाथ मयेकर (धारवाड) यांनी आपल्या गटात विजेतेपद पटकावले.
त्यानंतर झालेल्या मि. फॉरेव्हर क्लासिक किताबासाठी ऋतिक लाखे, संजय के., आकाश आर., रमेश अंबिगार, प्रताप कालकुंद्रीकर, रियाझ खान, वरुणकुमार जीव्हीके यांच्यात लढत झाली. यावेळी तुलनात्मक लढत प्रताप कालकुंद्रीकर, रमेश अंबिगार यांच्यात झाली. त्यामध्ये बेळगावच्या प्रताप कालकुंद्रीकरने मि. फॉरेव्हर क्लासिक हा किताब पटकाविला तर धारवाडच्या रमेश अंबिगारला पहिल्या उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले. मान्यवरांच्या हस्ते विजेत्या प्रताप कालकुंद्रीकर, उपविजेत्या रमेश अंबिगारला रोख रक्कम, चषक, प्रमाणपत्र व भेटवस्तू देऊन गौरवण्यात आले.









