प्रविण कणबरकर उपविजेता, उमेश गंगणे उत्कृष्ट पोझर
बेळगाव : कलबुर्गी येथील शाहबाद येथे कर्नाटक राज्य शरीरसौष्ठव संघटना व शाहबाद तालुका शरीरसौष्ठव संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने मि. कर्नाटक श्री राज्यस्तरीय शरीरसौष्ठव स्पर्धेत बेळगावच्या प्रताप कालकुंद्रीकर याने आपल्या पिळदार शरीराच्या जोरावर मि. कर्नाटक श्री चॅम्पियन्स ऑफ चॅम्पियन हा मानाचा किताब पटकाविला. बेळगावच्या प्रविण कणबरकरला पहिल्या उपविजेत्या क्रमांकावर समाधान मानावे लागले. बेळगावच्या उमेश गंगणेने उत्कृष्ट पोझरचा किताब पटकाविला. कलबुर्गी येथील शाहबाद सहारा सभागृहात आयोजित करण्यात आलेली स्पर्धा आयबीबीएफ मुंबईच्या मान्यतेनुसार 6 वजनी गटात घेण्यात आली. निकाल पुढीलप्रमाणे,
55 किलो गट : 1) सय्यद गौस (कलबुर्गी) 2) मंजुनाथ कांपल्ली (धारवाड) 3) इरफान (कलबुर्गी) 4) सनतकुमार डीएस (धारवाड).
60 किलो गट : 1) उमेश गंगणे (बेळगाव) 2) नितीश गोरल (बेळगाव) 3) मुकरान (कलबुर्गी) 4) मंजु (विजयनगर) 5) अर्नाल्ड (द. कन्नडा).
65 किलो गट : 1) सोमशेखर कारवी (उडपी) 2) रोनार्ल्ड डिसोझा (द. कन्नडा) 3) रोहन अल्लुर (बेळगाव).
70 किलो गट : 1) प्रताप कालकुंद्रीकर (बेळगाव) 2) चंदा शेख (कलबुर्गी) 3) गिरीश शहापूरकर (कलबुर्गी) 4)शिवकुमार जलकी (कलबुर्गी) 5) एम. डी. माज (कलबुर्गी).
75 किलो गट : 1) प्रविण कणबरकर (बेळगाव) 2) महेश कुमार (कलबुर्गी) 3) रमेश अंबीगर (धारवाड).
75 वरील किलो गट : 1) विकास सुर्यवंशी (बेळगाव) 2) गजानन काकतीकर (बेळगाव) यांनी विजेतेपद पटकाविले. त्यानंतर मि. कर्नाटक श्री किताबासाठी सय्यद गौस, उमेश गंगणे, सोमशेखर कारवी, प्रताप कालकुंद्रीकर, प्रविण कणबरकर, विकास सुर्यवंशी यांच्यात लढत झाली. त्यामध्ये प्रताप कालकुंद्रीकर, प्रविण कणबरकर व विकास सुर्यवंशी यांच्यात तुलनात्मक लढत झाली. त्यामध्ये प्रताप कालकुंद्रीकरने आपल्या पिळदार शरीराच्या जोरावार मि. कर्नाटक श्री चॅम्पियन्स ऑफ चॅम्पियन हा किताब पटकाविला. तर प्रविण कणबरकर याला पहिल्या उपविजेत्या पदावर समाधान मानावे लागले. पाहुण्यांचे हस्ते प्रताप कालकुंद्रीकर याला मानाचा किताब, 20 हजार रूपये रोख, आर्कषक चषक, प्रमाणपत्र व भेटवस्तु तर पहिल्या विजेत्या प्रविण कणबरकरला 10 हजार रूपये रोख व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. तर उत्कृष्ट पोझर उमेश गंगणेला 5 हजार रूपये रोख, चषक देऊन गौरविण्यात आले.









