प्रतिनिधी देवरुख
चिपळूण-संगमेश्वर विधानसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे उमेदवार प्रशांत यादव यांच्या देवरूख नगरीतील घरोघरी प्रचाराला शनिवारी प्रारंभ झाला. देवरूखची ग्रामदेवता व ४४ खेड्यांची मालकीण श्री सोळजाई देवीचा शुभाशीर्वाद घेऊन प्रचाराचा शुभारंभ करण्यात आला.श्री सोळजाई देवीला महाविकास आघाडीचे उमेदवार प्रशांत यादव हे भरघोस मतांनी निवडून येऊ देत, असे गाऱ्हाणे घालण्यात आले. याप्रसंगी राष्ट्रवादीचे जिल्हा उपाध्यक्ष मोहन वनकर, तालुकाध्यक्ष बाबा साळवी,शहराध्यक्ष नीलेश भुवड, जि. प. माजी सदस्या वेदा फडके, माजी उपसभापती अजित गवाणकर, माजी नगराध्यक्षा नीलम हेगशेट्ये, इस्तियाक कापडी, अल्ताफ जेठी, विनित बेर्डे, सलोनी शिंदे, आदिती पवार, जयंत चव्हाण, आप्पा सावंत यांच्यासह महाविकास आघाडीचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.









