कोल्हापूर :
जिल्हा व सत्र न्यायालयात प्रशांत कोरटकरने दाखल केलेल्या जामिन अर्जावर सोमवारी जिल्हा व सत्र न्यायाधीश डी. व्ही. कश्यप यांच्या न्यायालयात सुनावणी झाली. जामीन अर्जावर बुधवार 9 एप्रिल रोजी निकाल देण्याचे न्यायालयाने स्पष्ट केले. त्यामुळे कोरटकरचा कळंबा कारागृहातील मुक्काम आणखीन काही दिवस वाढला आहे.
या सुनावणीवेळी सरकारी वकील विवेक शुक्ल, सावंत यांचे वकील असीम सरोदे यांनी न्यायालयात हजर राहून, कोरटकरला जामिन देवू नये. याकरीता जोरदार विरोध केला. तर कोरटकरचे वकील सौरभ घाग यांनी व्हीसीव्दारे न्यायालयात हजर राहून, त्याचा जामिनअर्ज मंजूर करावा, यासाठी जोरदार युक्तीवाद केला.
याचदरम्यान इतिहास संशोधक इंद्रजित सावंत यांनी छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्याबद्दल चुकीची विधाने केली आहेत. धार्मिक भावना दुखावल्या आहेत. त्यांच्यावर गुन्हा दाखल असून अटकही झाली होती. अशा प्रकारचे विधान संशयीत कोरटकरच्या वकीलांनी जामीनअर्जा सोबत जोडलेल्या पत्रामध्ये केले होते. कोरटकरच्या वतीने दिलेली ही माहिती खोटी आहे. त्यामुळे सावंत यांनी कोरटकरवर अब्रु नुकसानीची नोटीस काढली असून, ही नोटीस सोमवारी कळंबा कारागृहात जाऊन बजाविण्यात आली आहे, अशी माहिती सावंत यांचे वकील असीम सरोदे यांनी प्रसारमाध्यमांना दिली.
कोरटकरने जामीनअर्जाच्या कागदपत्रात केलेल्या बदनामी कारक वक्तव्याची दखल घेवून, सावंत यांनी कोरटकरविरोधी अब्रु नूकसानीची नोटीस सोमवारी काढून, ती नोटीस वकील योगेश सावंत यांच्यामार्फत कळंबा कारागृहात जावून, तुरुंगाधिकारी अविनाथ भोईर यांच्याहस्ते कोरटकर बजाविण्यात आली आहे.
इतिहास संशोधक सावंत यांना संपूर्ण महाराष्ट्र ओळखतो, तसेच त्यांचा नावलौकीक आहे. मात्र कोरटकर व त्याच्या वकीलांनी सावंत यांची प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळेच त्याच्या विरोधी अब्रु नुकसानीची नोटीस काढली असून, त्याला ही नोटीस कारागृहात जावून तुरुंगाधिकारी भोईर यांच्याहस्ते कोरटकरला दिली आहे.
वकील असीम सरोदे
- रक्कम मृत सैनिकांच्या नातेवाईकांना
कोरटकरच्या विरोधी जी अब्रु नुकसानीची नोङटीस काढली आहे. या नोटीसमध्ये नुकसान भरपाईची रक्कम घातलेली नाही. मात्र भविष्यात सुनावणीवेळी ती सांगितली जाईल. ही रक्कम मराठा रेजिमेंटच्या मृत सैनिकांच्या नातेवाईकांना दिली जाणार आहे, अशी माहिती सावंत यांनीच असे सुचविली आहे, अशी माहिती त्यांचे वकील सरोदे यांनी सांगितली.








