वृत्तसंस्था/ पाटणा
बिहारचे माजी मुख्यमंत्री लालूप्रसाद यादव हे आपल्या दहावी नापास मुलाला राज्याचे मुख्यमंत्री बनवू इच्छित आहेत. पण या राज्यात बीए, एमए प्रथम वर्गात उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना नोकऱया मिळत नाहीत, अशी टीका राजकीय विश्लेषक प्रशांत किशोर यांनी केली आहे. प्रशांत किशोर सध्या बिहारची पदयात्रा करत असून त्यांनी शनिवारी गोपालगंज जिल्हय़ाच्या चैनपट्टी गावात जनसंवाद कार्यक्रम केला. त्यावेळी त्यांनी बिहारच्या कायदा सुव्यवस्था परिस्थितीविषयी चिंता व्यक्त करताना राज्यात पुन्हा गुन्हय़ांचे प्रमाण भयावहरीतीने वाढत असल्याची टीका केली. प्रशांत किशोर सध्या त्यांच्या पदयात्रेच्या अंतिम टप्प्यात आहेत.









