रामा सोमशेखर पहिले उपविजेतेपद तर धिरज उडपी दुसरे उपविजेतेपद, प्रताप कालकुंद्रीकर उकृष्ट मस्क्युलर
क्रीडा प्रतिनिधी / बेळगाव
धारवाड येथे कर्नाटक राज्य शरीरसौष्ठव संघटना व मि. साम क्लासिक राज्यस्तरीय शरीरसौष्ठव स्पर्धा व निवड चाचणीत बेळगावच्या प्रशांत खन्नुकरने आपल्या पिळदार शरीराच्या जोरावर चॅम्पियन ऑफ चॅम्पियन्स हा किताब पटकाविला तर बेंगळूरच्या रामा सोमशेखर याने पहिले उपविजेते तर उडपीच्या धिरजला दुसऱ्या उपविजेत्यापदावर समाधान मानावे लागले. बेळगावच्या कालकुंद्रीकरला मोस्ट मोस्क्युलरचा किताब बहाल करण्यात आला.
धारवाड येथे घेण्यात आलेल्या या स्पर्धेत आयबीबीएफ, मुंबईच्या नियमानुसार ही स्पर्धा वजनी गटात घेण्यात आली. निकाल पुढील प्रमाणे… 55 किलो वनजी गट 1) किरण तरळे-बेळगाव, 2) राजू मुचंडीकर-बेळगाव, 3) विजय जनगौडर-धारवाड, 4) अलोककुमार-मंगळूर, 5) आदिल काटवाल-धारवाड.
60 किलो गट 1) विशाल निलजकर-बेळगाव, 2) उदय मुरकुंबी-बेळगाव, 3) गजानन गावडे-बेळगाव, 4) नंदेश कुंभार-धारवाड, 5) गौतम बी. आर.-चिक्कमंगळूर
65 किलो गट 1) मंजुनाथ सोनटक्की-बेळगाव, 2) सुरज -कारवार, 3) इरफान-बेंगळूर, 4) मंजुनाथ बी.-चित्रदुर्ग, 5) शबीलाल-विजापूर
70 किलो गट 1) धिरज-उडपी, 2) व्यंकटेश ताशिलदार-बेळगाव, 3) ऋषिकेश कामादली-धारवाड, 4) आदित्य मोरे-बेळगाव, 5) अभिलाश एस.-शिमोगा
75 किलो गट 1) प्रताप कालकुंद्रीकर-बेळगाव, 2) राम बेळगावकर-बेळगाव, 3) सुनील भातकांडे-बेळगाव, 4) रामकृष्ण जे.-चिक्कमंगळूर, 5) राहुल कुलाल-बेळगाव
80 किलो गट 1) प्रशांत खन्नुकर-बेळगाव, 2) वर्चिन कुमार-बेंगळूर, 3) मंजुनाथ पी.-शिमोगा, 4) संदीप रामपूर-विजापूर, 5) काशिनाथ नायकर-धारवाड
80 किलो गट 1) रामा सोमशेखर-बेंगळूर, 2) चरणराज-उडपी, 3) अमन शेख-मंगळूर, 4) मोहम्मद नुराल्ला-चित्रदुर्ग, 5) सत्यानंद भट्ट-म्हैसूर
त्यानंतर मि. साम क्लासिक किताबासाठी राम सोमशेखर, प्रशांत खन्नुकर, प्रताप कालकुंद्रीकर, धिरज, मंजुनाथ सोनटक्की, विशाल निलजकर, किरण तरळे यांच्यात लढत झाली. त्यामध्ये प्रशांत खन्नुकर व रामा सोमशेखर यांच्यात तुलनात्मक लढत झाली. त्यामध्ये बेळगावच्या प्रशांत खन्नुकरने आपल्या पिळदार शरीराच्या जोरावर मि. साम क्लासिक हा किताब पटकाविला. रामा सोमशेखरला पहिला उपविजेतेपद तर उडपीच्या धिरजला दुसरे उपविजेतेपद देवून गौरविण्यात आले. तर बेळगावच्या प्रताप कालकुंद्रीकरला मोस्ट मस्क्युलर्स किताबने गौरविण्यात आले.









