बेळगाव : कावळे मॉडर्न जिम आयोजित मि.मॉडर्न जिल्हास्तरीय टॉप टेन स्पर्धेत नेक्स लेव्हल जीमच्या प्रशांत खन्नुकरने आपल्या पिळदार शरीराच्या जोरावर मि. मॉडर्न हा मानाचा किताब पटकाविला. मंजुनाथ कोल्हापूरे याला उत्कृष्ट पोझरने गौरविण्यात आले. मराठा मंडळच्या सभागृहात आयोजित या स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून शंकरगौडा पाटील, रमाकांत कोंडुसकर, मीनाताई बेनके, किरण कावळे, शिवाजी माने, क्रितेश कावळे, प्रेमनाथ नाईक, मोहन कारेकर, संकेत यादव, एम. गंगाधर, प्रकाश पुजारी, एम. के. गुरव, हेमंत हावळ, गणपत पाटील उपस्थित होते. पंच म्हणून राजकुमार बोकडे, राजू मर्वे, नितीन जाधव, राकेश वाधवा, किरण पोटे, स्टेज मार्शल म्हणून सदानंद बडवाण्णचे, आकाश कावळे, संदीप बडवाण्णचे यांनी काम पहिले.मि. मॉडर्न किताबाचा विजेतेपद नेक्स्ट जिमच्या प्रशांत खन्नुकर,बेस्ट पोझर मंजुनाथ कोल्हापूरे तर पहिला उपविजेता पॉलिहैड्रॉनच्या प्रताप काळकुंद्रिकर यांना देण्यात आले. स्पर्धेचा निकाल पुढील प्रमाणे,
1.प्रशांत खन्नुकर-नेक्स्टलेव्हल 2. प्रताप कालकुंद्रीकर-पॉलिहैड्रॉन 3. वेंकटेश ताशिलदार-पॉलिहैड्रॉन 4. राम बेळगांवकर-एसएसएस फौंडेशन 5. मोंहमद सकिब-चिकोडी 6. सुनिल भातकांडे-पॉलिहैड्रॉन,7.राहुलकुलाल-नेक्स्ट 8. विनीत हनमशेट-रॉ 9. मंजुनाथ कोल्हापूरे-लाईफटाईम 10. अविनाश परीट-निपाणी यांनी विजेतेपद पटकाविले.विजेत्या शरीरसौष्ठवपटूंना मान्यवरांच्या हस्ते बक्षीस देण्यात आले.









