वृत्तसंस्था / हाँगझोयु (चीन)
चीनमध्ये विविध टेनिस स्पर्धा खेळविल्या जात आहेत. दरम्यान हाँगझोयु खुल्या पुरुषांच्या टेनिस स्पर्धेत भारताच्या विजय सुंदर प्रशांत आणि एन. जीवन यांनी पुरूष दुहेरीची उपांत्य फेरी गाठली आहे. तर चेंगडू टेनिस स्पर्धेत भारताच्या युकी भांब्रीने ओलीव्हेटी समवेत दुहेरीच्या उपांत्यफेरीत प्रवेश केला आहे.
विजय सुंदर प्रशांत आणि एन. जीवन यांनी उपांत्यपूर्व फेरीच्या लढतीत द्वितीय मानांकित जोडी ज्युलीयन कॅश व लॉईड ग्लासपूल यांचा 6-7(4-7), 7-6(8-6), 10-8 अशा सेटस्मध्ये पराभव केला. हा सामना 2 तास चालला होता. चेंगडूमधील स्पर्धेत युकी भांब्री आणि त्याचा फ्रान्सचा साथीदार ओलीव्हेटी यांनी इस्कोबार आणि हिडाल्गो यांचा 5-7, 6-3, 12-10 असा पराभव करत उपांत्यफेरीत प्रवेश केला.









