सावंतवाडी | प्रतिनिधी
शेर्ले येथील प्रशांत सुरेश जाधव यांची मागासवर्गीय सेल युवा तालुका प्रमुखपदी मंगळवारी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख संजू परब यांनी केली . स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेकडून ही नियुक्ती करण्यात आली असून प्रत्येक सेल ऍक्टिव्ह करण्यात येत आहेत. मागासवर्गीय सेलची बैठक आज घेण्यात आली. यावेळी मागासवर्गीय सेलचे जिल्हाप्रमुख गुंडू जाधव ,गजानन नाटेकर, परीक्षित मांजरेकर,प्रेमानंद देसाई ,तालुकाप्रमुख नारायण राणे आधी उपस्थित होते.









