सावंतवाडी : प्रतिनिधी
यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या सावंतवाडी येथील श्रीराम वाचन मंदिर अभ्यासकेंद्रावरील वृत्तपत्रविद्या आणि जनसंज्ञापन पदविका अभ्यासक्रमात मळगाव येथीलप्रसन्न प्रदीप सोनुर्लेकर यांनी ७६.२५ टक्के गुणांसह प्रथम क्रमांक पटकाविला. वैभववाडी येथील
प्रल्हाद मनोहर मांजरेकर यांनी ७० टक्के गुणांसह द्वितीय तर सावंतवाडी येथील दीपक परशुराम पटेकर यांनी ६९.५० टक्के गुणांसह तिसरा क्रमांक पटकाविला. या विद्यार्थ्याना केंद्र संयोजक राजेश मोंडकर, संदीप तेंडोलकर, राहुल खिचडी, दिनेश केळुसकर, शिवप्रसाद देसाई,प्रा. रुपेश पाटील यांचे मार्गदर्शन लाभले. यशस्वी विद्यार्थ्याचे केंद्र प्रमुख रमेश बोन्द्रे, श्रीराम वाचन मंदिरचे अध्यक्ष प्रसाद पावसकर, कार्याध्यक्ष संदीप निंबाळकर यांनी अभिनंदन केले आहे.









