न्हावेली / वार्ताहर
मळगाव येथील प्रसन्न सोनुर्लेकर यांना यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठातर्फे जून २०२४ मध्ये घेण्यात आलेल्या तृतीय वर्ष पदवी परीक्षेत इतिहास विषयातून विद्यापीठात प्रथम क्रमांक पटकावला आहे.प्रसन्न हा सावंतवाडी येथील आरपीडी ज्युनियर कॉलेज कॅम्पसमधील डॅा.जे.बी.नाईक आर्ट्स ॲड कॉमर्स कॉलेज अभ्यासकेंद्राचा विद्यार्थी आहे. येत्या ३० जूनला नाशिक येथे विद्यापीठाच्या ३६ व्या वर्धापन दिनानिमित्त होणाऱ्या समारंभात प्रसन्नाला महाराष्ट्र शासन पुरस्कृत वेणूताई चव्हाण पारितोषिक देऊन गौरविण्यात येणार आहे.त्यांच्या या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष विकास सावंत,सचिव व्ही.बी.नाईक,खजिनदार सी.एल.नाईक,संस्थेचे पदाधिकारी केंद्र संचालक व शिक्षकेत्तर कर्मचारी तसेच मार्गदर्शक प्राध्यापक यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.









