Prasad Lad On Uddhav Thackeray : उद्धव ठाकरे यांनी सातत्याने मराठी माणसांच्या विचारांची पिळवणूक केली आहे. कोकणी मराठी माणूस, मुंबईकर मराठी माणूस, बाळासाहेबांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिला त्यांची देखील उद्धव ठाकरेंनी फसवणूक केली.आणि आता हिंदी भाषिकांची फसवणूक करताहेत.आम्ही नेहमी म्हणतो मराठी आमची आई,आणि हिंदी आमची मावशी, आईला यांनी फसवल आता मावशीला फसवण्याचे काम उद्धव ठाकरे करताहेत, अशी टीका भाजप आमदार प्रसाद लाड यांनी केली. आज ते पत्रकार परिषदेत बोलत होते.
पुढे बोलताना ते म्हणाले की, आता काय झालेय स्वतःचा पक्ष राहिला नाही. कार्यकर्ते राहिले नाही, आमदार राहिले नाहीत, मी आणि माझे कुटुंब माजी जबाबदारी एवढ्यापुरते राहिले. त्यामुळे दुसऱ्याच्या कुटुंबात जगा मिळवण्याचा उद्धव ठाकरेंचा केविलवाणा प्रयत्न असल्याचेही ते म्हणाले.
विरोधकांवर टीका करताना ते म्हणाले की, विरोधकांनी विरोधकाचा काम करावं. एकत्र येऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींचा पराभव करण्याचा प्रयत्न केला जातोय. म्हणजे नरेंद्र मोदी किती ताकतवर आहेत हे देशातील जनता जाणते. इंडिया बैठकिविषयी बोलताना ते म्हणाले की,
ईस्ट इंडिया कंपनी भारताला लुटायला आली तेव्हा त्याची सुरुवात मुबईतून झाली होती. कदाचित हे इतिहास विसरले असतील. पहिल्या दोन बैठका बाहेर झाल्या आता तिसरी बैठक मुंबईत होतेय. म्हणजे मुंबईच्या माध्यमातून इंडिया लुटता कशी येईल याची चर्चा ते करणार असा टोला लगावला.
संभाजी भिडे यांच्यासंदर्भात बोलताना ते म्हणाले की, संभाजी भिडे यांचे वक्तव्य कुठल्याही प्रसार माध्यमातून आलेलं नाही. हे वक्तव्य कोणीतरी सांगितलं म्हणून हे पुढे आलं आहे. काल सभागृहात मुख्यमंत्र्यांनी चूक असेल तर कारवाई होईल अस स्पष्ट केलं आहे. त्यामुळे मुख्यमंत्री किंवा उपमुख्यमंत्री यांच उत्तर येईपर्यंत यावर बोलण योग्य नसल्याचे ते म्हणाले.