आयुष, किरण कोरिया मास्टर्समध्ये पराभूत
वृत्तसंस्था / सुवोन
एचएस प्रणॉयची मोहीम निराशेने संपली कारण तो दुखापतीमुळे निवृत्त झाला तर आयुष शेट्टी व किरण जॉर्ज यांना पराभवाला सामोरे जावे लागल्याने भारताचे आव्हान संपुष्टात आले.
33 वर्षीय प्रणॉय इंडोनेशियाच्या चिको ऑरा द्वी वार्डोयोविरुद्ध 5-8 ने पिछाडीवर होता. तेंव्हा क्रॉस कोर्ट स्मॅश खेळल्यानंतर त्याला दुखापत झाली आणि त्याच्या उजव्या बरगड्यांना दुखापत झाली. मेडिकल टाईमआऊट घेतल्यानंतर तो पुन्हा खेळायला लागला परंतु अस्वस्थ वाटल्याने त्याला 8-16 अशी स्थिती असताना निवृत्त व्हावे लागले. यूएस ओपन सुपर 300 मध्ये या हंगामात बीडब्ल्यूएफ जेतेपद पटकावणारा एकमेव भारतीय आयुष शेट्टीला चायनीज तेपेईच्या सु ली यांगने 47 मिनिटांच्या सामन्यात 18-21, 18-21 ने पराभूत केले. किरण जॉर्जने जोरदार झुंज दिली आणि नंतर सिंगापूरच्या माजी विश्वविजेत्या लोह कीन यु विरुद्ध त्याला 14-21, 22-20, 14-21 असा पराभव पत्करावा लागला.
महिला एकेरीत अनुपमा उपाध्यायला चौथ्या मानांकीत आणि जागतिक क्रमवारीत 8 व्या स्थानावर असलेल्या इंडोनेशियाच्या पुत्री वर्दानीकडून 16-21, 15-21 असा पराभव पत्करावा लागला. मिश्र दुहेरीत मोहीत जगलन आणि लक्षिता जगलन यांना जपानच्या युइची शिमोगामी आणि सायाका होबारा यांच्याकडून 7-21, 14-21 असा पराभव पत्करावा लागला.









