वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
मंगळवारी घोषित करण्यात आलेल्या विश्व बॅडमिंटन फेडरेशनच्या ताज्या मानांकन यादीत भारताचा एच. एस. प्रणॉयने नवव्या स्थानावर झेप घेतली असून लक्ष्य सेन 11 व्या स्थानावर आहे.
विश्व बॅडमिंटन फेडरेशनच्या झालेल्या जपान खुल्या सुपर 750 दर्जाच्या स्पर्धेत लक्ष्य सेनला डेन्मार्कच्या व्हिक्टर अॅक्सेलसनकडून तर त्यानंतर इंडोनेशियाच्या जोनाथन क्रिस्टीकडून पराभव पत्करावा असल्याने प्रणॉयच्या मानांकनात सुधारणा असल्याने तो आता नवव्या तसेच लक्ष्य सेन 11 व्या स्थानावर आहे. भारताचा किदांबी श्रीकांत या मानांकनात 17 व्या स्थानावर असून पुरुष दुहेरीच्या मानांकनात सात्विकसाईराज आणि चिराग शेट्टी यांनी आपले दुसरे स्थान कायमर राखले आहे.









