वृत्तसंस्था/ कोपेनहॅगेन (डेन्मार्क)
विश्व बॅडमिंटन फेडरेशनच्या कौलालंपुर येथे सुरू असलेल्या विश्व बॅडमिंटन चॅम्पियनशिप स्पर्धेत पुरुष एकेरीत भारताच्या एच एस प्रणॉयने उपांत्यपूर्व फेरी गाठली आहे. मात्र भारताच्या लक्ष्य सेनचे आव्हान संपुष्टात आले आहे.
पुरुष एकेरीच्या शुक्रवारी खेळवण्यात आलेल्या सामन्यात 9 व्या मानांकित प्रणॉयने सिंगापूरच्या लोह किन येवचा 69 मिनिटांच्या कालावधीत 21-18, 15-21, 21-19 अशा गेम्समध्ये पराभव करत उपांत्यपूर्व फेरी स्थान मिळवले. मात्र भारताच्या आणखी एक सिडेड खेळाडू लक्ष्य सेनचे आव्हान संपुष्टात आले आहे. थायलंडच्या के. व्हीटीडसेमने लक्ष्य सेनचा 21-14, 16-21, 21-13 असा पराभव करत शेवटच्या आठ खेळाडूत स्थान मिळवले. हा सामना 68 मिनिटे चालला होता. या प्रतिष्ठेच्या स्पर्धेत भारताच्या सात्विक साईराज आणि चिराग शेट्टी यांनी पुरुष दुहेरीची उपांत्यपूर्व फेरी गाठली असून या जोडीने इंडोनेशियाच्या कॅमेंडो व मार्थिन यांचा पराभव केला आहे.









