मळगाव येथील खानोलकर वाचन मंदिरातर्फे आयोजन
न्हावेली / वार्ताहर
मळगाव येथील कै.प्रा.उदय रमाकांत खानोलकर वाचन मंदिरातर्फे जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून आयोजित पाककला स्पर्धेला महिला स्पर्धकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.पाककला स्पर्धेमध्ये प्रणिता परशुराम गवंडे यांनी प्रथम क्रमांक पटकावला.तसेच राधिका रुपेश कातळकर यांनी द्वितीय व अमृता सुहास खडपकर यांनी तृतीय क्रमांक मिळविला.सुविधा जयशंभो सावंत व वैभवी विजय खडपकर यांना उत्तेजनार्थ वस्तू रुपाने बक्षीसे व प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात आले.सदरची बक्षीसे महालक्ष्मी एंटरप्रायझेस,बांद्याचे प्रविण शिरसाट व हॅवल्स कंपनीचे ऋषिकेश ठाकूर यांनी पुरस्कृत केलेली होती.कार्यक्रमाचे उद्घाटन सौ मिनल तेली माजी तंटामुक्तीचे अध्यक्ष, मळगाव,प्रायोजक श्रीमती उज्वला खानविलकर , वाचन मंदिरचे अध्यक्ष महेश खानोलकर व परीक्षक सुमेधा सावळ व ज्योती सावंत यांच्या उपस्थितीत दीपप्रज्वलनाने करण्यात आले.सदर मळगाव गाव मर्यादित स्पर्धेत २० महिला स्पर्धकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला इतर सहभागी स्पर्धकांना प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात आले.यावेळी सौ.रंजना राजेश तेली यांनी ग्रंथालयाने घेतलेल्या पाककला स्पर्धेबाबत उत्स्फूर्त मनोगत व्यक्त केले. जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून मळगाव गावातील ‘ सखी भिषी ग्रुप ‘ च्या महिलांनी एकत्रित येऊन वाचन मंदिराला बहुमोल ग्रंथाची देणगी रुपाने ग्रंथभेट दिली.पाककला स्पर्धेचे परीक्षक सुमेधा सावळ व ज्योती सावळ यांनी केले.कार्यक्रमाचे प्रास्ताविक कार्यवाह गुरुनाथ नार्वेकर यांनी केले.तसेच सूत्रसंचालन व आभार संचालक पृथ्वीराज बांदेकर यांनी केले.









