पुस्तकात दावा : काँग्रेस नेत्याच्या डायरीचा दाखला
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
माजी राष्ट्रपती दिवंगत प्रणव मुखर्जी यांच्या कन्या शर्मिष्ठा यांच्याकडून ‘प्रणब माय फादर-ए डॉटर रिमेम्बर्स’ असे नाव असलेले पुस्तक लिहिण्यात आले आहे. हे पुस्तक माजी राष्ट्रपतींच्या डायरीतील नोंदीवर आधारित आहे. शर्मिष्ठा यांच्या पुस्तकात राहुल गांधी आणि सोनिया गांधी यांच्यावर शाब्दिक प्रहार करण्यात आले आहेत. काँग्रेसला गांधी-नेहरू परिवारासाठी राखीव क्रीडामैदान ठरवून काँग्रेसने स्वत:ची लोकशाहीवादी प्रतिमा गमावली असून यामुळे देशाचे राजकारण प्रभावित झाले आहे. स्वातंत्र्यानंतर एकाच परिवाराच्या 5 सदस्यांचा काँग्रेस अध्यक्षपदावर 37 वर्षांपर्यंत कब्जा राहिला असल्यास हा लोकशाहीच्या सर्वात खराब स्वरुपाचा पुरावा असल्याचे प्रणव मुखर्जी यांनी 28 जुलै 2020 रोजी स्वत:च्या डायरीत नमूद पेले होते.
गांधी-नेहरू परिवार आता संघटनेला शक्ती प्रदान करत नसून त्याची शक्ती संपवत आहे. 2004 नंतर पासून सोनिया गांधी आणि राहुल यांनी 2001-03 मध्ये अर्जित आधार आंशिक स्वरुपात गमावला आहे. ते आता केवळ कुठल्याही प्रकारे अन्य प्रादेशिक पक्षांसोबत काँग्रेसच्या नेतृत्वात केंद्रात सरकार स्थापन करण्यात रुची राखून असल्याची नोंद मुखर्जी यांनी स्वत:च्या डायरीत केली आहे.
1960 पासून डायरी लेखन
काळजीपूर्वक नोंदविण्यात आलेल्या आणि वस्तुनिष्ठ प्रकारे लिहिण्यात आलेलया पुस्तकात शर्मिष्ठा यांनी संपुआच्या महत्त्वपूर्ण शासनकाळामधील महत्त्वपूर्ण घटनांसंबंधी माहिती दिली आहे. प्रणव मुखर्जींना 1960 च्या दशकापासूनच डायरी लेखनाची सवय जडली होती. तर शर्मिष्ठा यांच्यानुसार हे पुस्तक डायरीत लिहिण्यात आलेल्या गोष्टी आणि अनेक वर्षांदरम्यान विविध मुद्द्यांवर प्रणवदांसोबत झालेल्या संभाषणावर आधारित आहे.
राहुल गांधी राजकीयदृष्ट्या अपरिपक्व
प्रणव मुखर्जींनी स्वत:च्या डायरीत विशेषकरून राहुल गांधी यांना राजकीय दृष्ट्या अपरिपक्व ठरविले आहे. 2013 मध्ये कलंकित राजकीय नेत्यांना संरक्षण देणाऱ्या अध्यादेशाची प्रत राहुल गांधी यांनी जाहीर पत्रकार परिषदेत फाडली होती. याप्रकरणी प्रणव मुखर्जी यांनी स्वत:च्या डायरीत राहुल गांधी यांच्याकडे कुठलेच राजकीय कौशल्य नाही तर स्वत:च्या गांधी-नेहरू परिवारासंबंधी अहंकार असल्याचे नमूद पेल होते.
..जेव्हा संतापले होते प्रणवदा
अध्यादेशाची प्रत फाडण्याचा प्रसंग घडल्यावर प्रणवदा प्रचंड संतापले होते. ते (राहुल गांधी) स्वत:ला काय समजतात? ते केंद्रीय मंत्रिमंडळाचा सदस्य नाहीत. मंत्रिमंडळाच्या निर्णयाला जाहीरपणे फेटाळणारे ते कोण? पंतप्रधान विदेशात आहेत. त्यांच्या या कृतीचा पंतप्रधान आणि सरकारवर काय प्रभाव पडणार याची जाणीव आहे का त्यांना? पंतप्रधानांना अशाप्रकारे अपमानि करण्याचा त्यांना कुठला अधिकार असे प्रणव मुखर्जी यांनी डायरीत नमूद केले होते.









