कट्टा : प्रतिनिधी
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वराडकर हायस्कुल व कनिष्ठ महाविद्यालय, कट्टा (ता. मालवण) येथील शिक्षक श्री. प्रकाश विठोबा कानूरकर यांना महाराष्ट्र शासनाचा क्रांतिज्योती सावित्रीमाई फुले राज्य आदर्श शिक्षक गुणगौरव पुरस्कार 2024-25 जाहीर झाला आहे. हा पुरस्कार मुंबई येथे आयोजित राज्यस्तरीय कार्यक्रमात उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. या वेळी शालेय शिक्षणमंत्री दादाजी भुसे, राज्यमंत्री डॉ. पंकज भोईर आणि शिक्षक आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे उपस्थित होते.श्री. कानूरकर यांनी गेल्या दोन दशकांहून अधिक काळ शिक्षणाबरोबरच सामाजिक व पर्यावरणीय क्षेत्रातही उल्लेखनीय कार्य केले आहे. व्यसनमुक्ती अभियान, कांदळवन बचाव मोहीम, पक्षी वाचवा अभियान यांसारख्या उपक्रमांत त्यांनी सक्रिय सहभाग नोंदवला आहे. तसेच 200 हून अधिक वडाच्या झाडांचे वृक्षारोपण, तसेच अंधश्रद्धा निर्मूलन समिती*च्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन निर्माण करण्याचे कार्य त्यांनी सातत्याने केले आहे.शैक्षणिक क्षेत्रातही त्यांचे योगदान लक्षणीय आहे. सलग 18 वर्षे इयत्ता दहावीच्या सेमी वर्गाचा 100 टक्के निकाल, एका वर्षातच 10 विद्यार्थी 90 टक्क्यांहून अधिक गुण मिळवणारे आणि गणित विषयात 100 पैकी 100 गुण मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांचे मार्गदर्शन*, अशी कामगिरी त्यांच्या मार्गदर्शनाखाली साध्य झाली आहे. तसेच राज्य व जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शन, व्हिडिओ निर्मिती आणि शिक्षक साहित्य निर्मिती स्पर्धांमध्ये विद्यार्थ्यांना त्यांनी यश मिळवून दिले आहे.
श्री. कानूरकर हे निसर्ग व सामाजिक पर्यावरण प्रदूषण मंडळ (जिल्हा अध्यक्ष), सिंधुदुर्ग जिल्हा विज्ञान मंडळ (सचिव) तसेच राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 प्रसारक (राज्यस्तरीय वेध परिवार सदस्य व जिल्हा समन्वयक) या पदांवर कार्यरत आहेत.यापूर्वी त्यांना युवा गौरव पुरस्कार (2001), ज्ञानदीप आदर्श शिक्षक पुरस्कार (2023), नॅशनल एज्यूकेशनल एक्सेलन्स अवॉर्ड (2023), राष्ट्रीय आदर्श शिक्षक कार्यकर्ता पुरस्कार (2022) आणि शिक्षणव्रती पुरस्कार (2024) अशा मानाच्या सन्मानांनी गौरविण्यात आले आहे.या पुरस्काराने सिंधुदुर्ग जिल्ह्याचा सन्मान वाढला असून, शिक्षक म्हणून श्री. प्रकाश कानूरकर यांचे शैक्षणिक, सामाजिक व पर्यावरणीय कार्य राज्य पातळीवर अधोरेखित झाले आहे.वराडकर हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय. कट्टा च्या शतकमहोत्सवी वर्षात 100 वर्षात प्रथमच एका शिक्षकांना शासनाचा पुरस्कार मिळाल्याने संस्थेसाठी अभिमानास्पद असा हा सन्मान आहे.या यशाबद्दल प्रशालेच्या मुख्याध्यापिका सौ. देवयानी गावडे व सर्व शिक्षक शिक्षिका ,व शिक्षकेतर कर्मचारी,विद्यार्थी. पालक यांनी सरांचे कौतुक केले. कट्टा पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळाचे विश्वस्त ॲड. एस. एस. पवार, कर्नल शिवानंद वराडकर अध्यक्ष श्री.अजयराज वराडकर.उपाध्यक्ष श्री आनंद वराडकर,उपाध्यक्ष तथा सरपंच श्री शेखर पेणकर, सचिव श्री. सुनील नाईक,श्रीमती विजयश्री देसाई,सहसचिव श्री एस. डी. गावडे, खजिनदार श्री. रवींद्र पावसकर, शालेय समिती अध्यक्ष श्री सुधीर वराडकर व सर्व संचालक मंडळ सदस्य ,पालक शिक्षक संघ सदस्य आणि माता पालक संघ सदस्य यांनी या गौरवमुर्तीचे अभिनंदन केले आहे.









