वृत्तसंस्था / नवी दिल्ली
येथे सुरू असलेल्या फिनेस्टा खुल्या राष्ट्रीय टेनिस चॅम्पियनशिप स्पर्धेत प्रकाश सरन, ऋतिक के. आणि तविश पी. यांनी मुलांच्या 16 वर्षांखालील वयोगटात एकेरीत विजयी सलामी देत दुसरी फेरी गाठली.
पहिल्या फेरीतील सामन्यात सहाव्या मानांकीत ऋतिकने रुद्र बी.चा 6-2, 6-1 अशा सेट्समध्ये पराभव करत विजयी सलामी दिली. हा सामना 70 मिनिटे चालला होता. दुसऱ्या एका सामन्यात आठव्या मानांकीत पी.तविशने ज्ञानेश मनचंदनाचा 6-3, 6-1 तसेच कर्नाटकाच्या टॉप सिडेड प्रकाश शरनने अथर्व आनंदचा 6-1 6-2 असा पराभव करत पुढील फेरीत स्थान मिळविले.









