शिवसेनेत बंडखोरी झाल्यानंतर पक्षावर हक्क सांगण्यासाठी दोन गट समोरासमोर असतानाच राज्यातील उद्धव ठाकरे गटाला वंचित बहूजन आघाडीची साथ मिळण्याच्या शक्यतांना आता फक्त औपचारिकता राहिली असल्याचे संकेत वंचित बहूजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी दिले आहेत. यापुर्वी काँग्रेस- राष्ट्रवादी सोबत आल्यास कसलीच हरकत नसल्याची प्रतिक्रिया प्रकाश आंबेडकरांनी दिली होती. त्यानंतर शिवसेनेशी आपली बोलणी सुरू असून त्यांचे अंतिम झाले कि अधिकृत घोषणा करण्यात येईल अशी प्रतिक्रिया दिली आहे.
माध्यमांनी वंचित आणि ठाकरे गटाच्या युतीबाबत विचारले बोलताना ते म्हणाले “सध्या पक्षाच्या प्रदेशाध्यक्षा रेखाताई ठाकूर रायगडमध्ये असून मी विदर्भात आहे. त्यामुळे अधिकृत घोषणा माझ्याकडून किंवा त्यांच्याकडून व्हायला हवी. बोलणी करण्यासाठी दोन्ही बाजूंचे गट बसलेले आहेत. त्यांचं अंतिम झालं की त्यानुसार लगेच अधिकृत घोषणा होईल.” अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली.
पुढे बोलताना ते म्हणाले, “उद्धव ठाकरेंना असे वाटत आहे की, आपण राष्ट्रवादी आणि काँग्रेसलासोबत घेतलं पाहिजे. तो शिवसेनेचा मुद्दा आहे. आम्ही त्यांना सांगितलं आहे की तुम्ही काँग्रेस आणि राष्ट्रवादी दोघांनाही सोबत घ्या. वंचित बहूजन आघाडी त्यांचं स्वागत करेल. ज्या दिवशी यासंदर्भात शिवसेनेचा निर्णय होईल, त्या दिवशी आम्ही अधिकृत घोषणा करून पुढे जाऊ” असं प्रकाश आंबेडकरांनी स्पष्ट केले.
Trending
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव
- Sangli Politics : राष्ट्रवादीचे दोन्ही गट सज्ज! कवठेमहांकाळात निवडणुकीची रणधुमाळी








