सध्याचे सरकार हे चोराचे असून सध्या राज्याला मुख्यमंत्री कोण आहे हेच समजत नाही. तसेच माणुसकी हिन माणसे सत्तेवर बसली असून महापुरुषांचा वारंवार अपमान केला जात आहे. या सररकारचे काही खर नसून ते स्वतामध्येच गुंतले आहे असा आरोप वंचित बहूजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांनी केला. ते आज नागपुरात (Nagpur) काढलेल्या मार्चात बोलत होते. राज्यात होणारा महापुरुषांचा अपमान आणि गायरानप्रश्नी त्यांनी आज नागपूर विधानभवनावर मोर्चा काढला होता.
यावळी बोलताना ते म्हणाले, “अतिक्रमणाबद्दल न्यायालयीन लढाईत सरकार आपली बाजू मांडायला गेले नसल्याने न्यायालयाने प्रशासना मार्फत अतिक्रमण हटवले. महाराष्ट्र सरकारला याबाबतीत निवेदन देउन विनंती केली होती. पण सध्याचे सरकार उदासिन आहे. राज्यातील सत्ता ही चोरांची आहे, या सरकारच मला काही खर दिसत नाही.” असे बोलून त्यांनी सध्याचे सरकार मुख्यमंत्री शिंदे चालवतायत कि उपमुख्यमंत्री फडणविस हेच कळत नाही असा खोचक सवाल केला. सध्या सत्तेला अमरत्व आणण्याचे काम चालु आहे. यापुर्वी कॉंग्रेसला हेच वाटत होते तेच सध्या भाजप आणि आरएसएस यांनीसु्दधा चालवले आहे असेही ते म्हणाले.
Previous Articleहुतात्म्यांच्या कुटुंबियांना दरमहा २० हजार रुपये भत्ता
Next Article केस ओले असताना या चुका टाळा








