वंचित बहुजन आघाडी (VBA) प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी शिवसेनेशी (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाबरोबरची युती आता राहीलेली नसल्याचे स्पष्ट केल्यानंतर, शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी प्रकाश आंबेडकरांच्या या निर्णयाला “एकतर्फी” आणि दुर्दैवी असल्याचं म्हटलं आहे. या वेळी सांगताना त्यांनी एक वर्षापुर्वी शिवसेना आणि वंचित बहूजन आघाडीची युती होताना लोकसभा निवडणुक अजेंड्यावर नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केलयं.
2024 च्या लोकसभा निवडणुकीसाठी महाराष्ट्रातील दोन्ही महायुती आणि विरोधी महाविकास आघाडी (MVA) यांच्यामध्ये जागावाटपाचा फॉर्म्युला अद्याप निश्चित होऊ शकला नाही. वंचित बहूजन आघाडी आणि शिवसेना यांच्यामध्ये युती झाल्यानंतर महाविकास आघाडीमध्ये येण्यास इच्छुक असलेल्या वंचित बहूजन आघाडीने आपल्या जागावाटपाच्या फार्म्युलासह काही नियम व अटी महाविकास आघाडीसमोर ठेवल्या. विषेशता जागावाटपामुळे वंचित आणि काँग्रेस यांच्यामध्ये नेहमीच संघर्ष राहीला.
शेवटी एका माध्यमाला मुलाखत देताना प्रकाश आंबेडकरांनी शिवसेना आणि वंचित बहूजन आघाडी यांच्यामध्ये आता युती राहीली नसल्याचं स्पष्ट केले. त्यांच्या या विधानाने राजकिय क्षेत्रात खळबळ उडाली. प्रकाश आंबेडकरांच्या या वक्यव्यावर बोलताना ठाकरे गटाचे संजय राऊत यांनी हे दुर्दैवी असल्याचं म्हटलं आहे. वंचित बहूजन आघाडी आणि शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षामध्ये झालेली युती ही महानगर पालिका आणि स्थानिक निवडणुकांसाठी होती. या युतीमध्ये लोकसभा निवडणुका अजेंड्यावर नव्हत्या. ही युती चांगल्या हेतूने करण्यात आली होती. अशा प्रकारची घोषणा करण्यापूर्वी प्रकाश आंबेडकरांनी एकदा ठाकरेंशी चर्चा करायला हवी होती. त्यांनी घेतलेला हा निर्णय एकतर्फी आणि दुर्दैवी आहे अशी त्यांनी प्रतिक्रिया दिली.