Prakash Ambedkar : महाराष्ट्रात पुढे येणाऱ्या निवडणूका या शिवसेनेसोबत लढणार आहोत. विरोधातला विरोधी तो आपला मित्र अशी भूमिका राजकारणातील असते. भाजपसोबत वंचित कधीही गेला नाही.भाजपसोबत असणाऱ्या पक्षांना कधीच पाठिंबा नाही.भाजपसोबत कुठलाही समझोता करणार नाही.ठाकरे गटासोबत राहण्यावर प्रकाश आंबेडकर ठाम असल्याचे आज त्यांनी पत्रकार परिषदेत स्पष्ट केले. वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यात काल बंद दाराआड अडीच तास बैठक झाली.यांच्या भेटीमुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधान आले आहे. आंबेडकर भाजप सोबत जाणार का? अशा चर्चा सुरु होत्या. यावर आंबेडकरांनी स्पष्टीकरण दिलं आहे.
यावेळी बोलताना ते म्हणाले की, कॉँग्रेस, राष्ट्रवादीने आमचा खिमा केला.कॉँग्रेस, राष्ट्रवादीने ठाकरे गटाला फसवलं.माझी आणि माझ्या पक्षाची ताकद मला माहित आहे. शिंदेंनी भाजपची साथ सोडली तर विचार करू असेही ते म्हणाले. शिवसेना आणि वंचित यांची चार भिंतीआड चर्चा झाली आहे. ठाकरे गट आणि वंचित यांची युती होणार, आम्ही तयार असल्याचे उध्दव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेवून स्पष्ट करावे असेही ते म्हणाले. नोएडा येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची प्रतिकृती करण्याचे काम सुरु आहे. याबबात काल चर्चा झाल्याचे तसेच अनेक विषयावर चर्चा झाल्याचे स्पष्ट केले.
Previous Articleबेळगावमधील हॉटेल्सना १ लाख १४ हजार रुपये दंड
Next Article Kolhapur : घरफाळा बुडव्यांचा होणार पोलखोल








