जालना येथील लाठीहल्ल्यानंतर आपले उपोषण चालु ठेवणाऱ्या मराठा आरक्षण आंदोलकांनामधील उपोषणकर्ते मनोज जरांगे- पाटील यांची आज वंचित बहूजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकरांनी भेट घेतली. जालना जिल्ह्यातही राज्य सरकार ‘शासन आपल्या दारी’ हा कार्यक्रम घेणार का ? असा खोचक सवाल त्यांनी विचारला. तसेच देशात हुकुमशाही असून राज्यकर्ते तशा प्रकारची मानसिकता देशातील नागरिकांची तयार करत असल्याचा आरोपही त्यांनी केला. आपल्या भेटीत प्रकाश आंबेडकरांनी मनोज जरांगे- पाटील यांना हा लढा चालू ठेवण्यासाठी तब्येतीची काऴजी घेतली पाहीजे असे आवाहनही केले.
जालन्यातल्या अंतरवाली सराटी येथे वंचित बहूजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी भेट घेतली यावेळी त्यांनी मराठा आरक्षणाचा लढा चालू ठेवला पाहीजे असे म्हटले. तसेच मनोज जरांगे- पाटील यांचे मराठा आरक्षणासाठीच्या लढ्यासाठी गरज असून त्यांनी आपली तब्येत प्रथम सांभाळली पाहीजे असे ते म्हणाले. तसेच या लढ्यासाठी आपण मराठा आंदोलकांच्या पाठीशी असल्याचेही सांगितले.
यावेळी ते म्हणाले, “हा लढा चालु ठेवण्यासाठी मनोज जरांगे- पाटील यांनी तब्येतीकडे लक्ष दिले पाहीजे. त्यांनी मरणाच्या गोष्टी करू नये, जिवाचे काही बरे वाईट झाले तर हा लढा कोण चालु कोण ठेवणार.” असे ते म्हणाले.
पुढे बोलताना ते म्हणाले, “सरकारला डेटा पाहीजे असेल तर देशातील नावाजलेल्या संस्था आहेत त्यांच्याकडून डेटा मिळाला असता. आरक्षणासंदर्भात शासनाचीच उदासिनता आहे. मराठा आरक्षणासंबंधाचा प्रश्न आम्ही उचलण्याचा प्रय़त्न केला पण ज्यांच्यावर याची जबाबदारी होती त्यांनी नेहमीच उदासिनता दाखवली आहे. सुप्रिक कोर्टात जे मत मांडण्यात आले त्यामध्ये बऱ्याच गोष्टी अंतर्भुत नव्हत्या त्यामुळे यामध्ये केंद्राचा आणि राज्याचा दोघांचाही दोष आहे.” असेही ते म्हणाले.
तसेच त्यांनी महाविकास आघाडीला अप्रत्यक्ष आवाहन करताना महाराष्ट्रातील जिवंत प्रश्नावर भुमिका घेणार असाल तर आम्ही तुमच्या बरोबर आहोत असे म्हटले आहे. महाराष्ट्रात दडपशाही चालु आहे. त्यांच्या दडपशाहीचा मला चांगला अनुभव आहे. पोलिसांना आवाहन आहे कि तुम्हीही माणुस आहात नेत्यांनी आदेश दिल्यानंतर लोकांवर अमानुष अत्याचार करू नका. असे आवाहन केले.
सरकारला प्रश्न विचारताना ते म्हणाले, “जालना जिल्ह्यातही सरकार शासन आपल्या दारी हा कार्यक्रम घेणार का ? असा प्रश्न त्यांनी विचारला. सकल मराठा समजाचा मोर्चा निघाला त्यावेळी त्यांनी दुसऱ्याच्या ताटातील नको असं सांगितले आहे. शासनाने त्यांच्या मागणचा आदर करावा. ओबीसींचा कोटा वाढवून त्यातून देण्यापेक्षा वेगळाच करून द्या.” असे आवाहन त्यांनी केले.
सनातन धर्मावर बोलताना ते म्हणाले, “देशात हुकुमशाही वाढ असून त्यांची मानसिकता लोकांच्या मनात वाढत आहे. सनातन धर्म जातीवाद मानतो. सनातन जातीव्यवस्था काढण्यासाठी प्रयत्न करणार आहे ? माझ्यावर टिका करणाऱ्यांनी या प्रश्नाचे उत्तर द्यावे.” असा सवाल त्यांनी केला.








