वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष आणि माजी खासदार प्रकाश आंबेडकर हे नागपूर येथून दिल्लीसाठी रवाना झाले आहेत. यापुर्वी कॉग्रेसचे महासचिव के. वेणूगोपाल य़ांनी भेट होणार असल्याचे संकेत दिले गेले होते. आंबेडकर यांच्या दिल्ली दौऱ्यात कॉंग्रेसचे नेते राहूल गांधी यांची भेट होणार असल्याचे सूत्रांकडून कळत आहे.
अधिक माहितीनुसार महाराष्ट्रात वेगाने बदलणाऱ्या राजकिय घडामोडीनंतर कॉंग्रेस आणि शिवसेना आता वंचित बहूजन आघाडीला आपल्या महाविकास आघाडीमध्ये घेण्य़यात उत्सुक असल्याचे कॉंग्रेसच्या प्रवक्तांनी सांगितले आहे. यापुर्वी शरद पवारांनी वंचित च्या महाविकास आघाडीमघ्ये सामिल होण्याला छुपा विरोध दर्शविला होता. पण मागिल वर्षी शिवसेना आणि यावर्षी राष्ट्रवादी कॉग्रेस पार्टीमध्येच उभी फुट पडल्याने कॉंग्रेस सक्षम पर्याय शोधत आहे. वंचितबरोबरच्या नविन आघाडीने महाराष्ट्रातील राजकिय समीकरणे बदलणार आहेत.
राज्यातील बदलत्या राजकिय समीकरणामुळे कॉंग्रेसही आता आक्रमक झाली असून मागासवर्गीय आणि दलित मतदानाचा मोठा पाठींबा लाभलेल्या वंचित बहुजन आघाडीबरोबर बोलणी करण्यास उत्सुक असल्याचे राजकिय तज्ञांनी सांगितले आहे.
प्रकाश आंबेडकर आपल्या दौऱ्यामध्ये कॉंग्रेसचे महासचिव के. वेणूगोपाल यांच्याशी प्राथमिक भेट घेणार असून आघाडीसंदर्भात प्रत्यक्ष चर्चा राहूल गांधी यांच्याशी भेटूनच करणार असल्याचे सूत्रांनी सांगितले आहे. वंचित बहूजन आघाडी ज्या जागेवरून दोन नंबरची मते मिळवली आहेत त्या जागांसाठी आग्रह आसल्याचेही कळत आहे.








