राधानगरी, महेश तिरवडे
Ayushman Bhav Abhiyan : आयुष्यमान भारत योजने अंतर्गत आयुष्मान भव योजना राधानगरी ग्रामीण रुग्णालयात प्रभावीपणे राबवा असे प्रतिपादन आमदार प्रकाश आबीटकर यांनी केले. ग्रामीण रुग्णालय राधानगरी येथे 17 सप्टेंबर ते 31 डिसेंबर या कालावधीत आरोग्य योजनेच्या माध्यमातून रुग्णांना सेवा उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्नशील रहावे असे आवाहन यावेळी केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुप्रिया देशमुख उपस्थित होत्या.
यावेळी बोलताना प्रकाश आबीटकर यांनी येत्या दोन दिवसात ग्रामीण रुग्णालयात पोस्टमार्टेमची सोय उपलब्ध करून दिली जाईल.तसेच 2 ऑक्टोबर रोजी ग्रामीण रुग्णालयात डायलिसीस विभाग सुरू करण्यात येणार असल्याची माहिती दिली.आगामी काळात या ग्रामीण रुग्णालयात 100 खाटांचे उपजिल्हा रुग्णालय उभारणीसाठी आपण प्रयत्न करू असेही सांगितले.
ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ,गणपती गवळी यांनी या योजनेच्या मुख्य उद्देश या बद्दल सविस्तर माहिती दिली. तसेच गोकुळ संचालक अभिजित तायशेटे, संभाजी आरडे आदींनी मनोगत व्यक्त केले.
यावेळी भाजपचे तालुका अध्यक्ष विलास रणदिवे,माजी सरपंच विजय ढेरे,अनिल बडदारे,सतिष फणसे,सचिन पालकर,मयूर पोवार,मंगेश चौगुले,पिरळचे सरपंच संदीप पाटील,प्रा,चंद्रशेखर कांबळे,विलास डवर ,विक्रम पालकर पंढरीनाथ खांडेकर यांच्यासहआरोग्य विभागाचे कर्मचारी,व्यापारी व नागरिक या कार्यक्रमास उपस्थित होते.









