वार्ताहर/येळ्ळूर
नुकत्याच झालेल्या जिल्हा पातळीवर 80 मी. अडथळा क्रीडा स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळवून राज्य पातळीवर निवड झाल्याबद्दल प्राजक्ता प्रशांत पाटील हिचा देसूर ग्रामस्थ, एसडीएमसी व शिक्षक यांच्यातर्फे सत्कार करुन 6 नोव्हेंबर रोजी होणाऱ्या स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या. ती एसडीएमसीचे सदस्य प्रशांत जोतिबा पाटील यांची कन्या आहे. यावेळी रमेश नंद्याळकर, चंदू पोटे, हणमंत चव्हाण, एसडीएमसीचे अध्यक्ष शांताराम कुपटगीरी, जोतीबा काळसेकर, मारुती लक्कबैलकर, प्रशांत पाटील, प्रभारी मुख्याध्यापक आनंद पाटील, क्रीडा शिक्षक व्ही. एन. गावडे यांच्यासह शिक्षक व विद्यार्थी उपस्थित होते.









