मारोळी / प्रतिनिधी
मंगळवेढा उपविभागीय कार्यालय मंगळवेढा येथे प्रहार संघटनेचे आंदोलन हे 24 व्या दिवशी सुद्धा सुरूच आहे जोपर्यंत शेतकऱ्यांना न्याय मिळत नाही तोपर्यंत ते आंदोलन सुरूच राहील अशी ठाम भूमिका प्रहारचे मंगळवेढा तालुका अध्यक्ष समाधान हेंबाडे यांनी घेतली आहे.
काझी बाधित शेतकऱ्यांना कधी न्याय मिळणार? गेली चार वर्षे झाली शेतकरी मोबदल्यासाठी प्रांत ऑफिसला हेलपाटे मारत आहेत. तरीही उपविभागीय अधिकारी, जिल्हाधिकारी का दखल घेत नाहीत? अशी चर्चा मंगळवेढा तालुक्यात होत आहे. वरचेवर या आंदोलनाला वाढता पाठिंबा दिसत असला तरी अधिकारी मात्र दुर्लक्ष करीत आहे. त्यामुळे ‘प्रहार’नी घेतलेली भूमिका ही योग्यच आहे. या अधिकाऱ्यांची बदली होणे गरजेचे आहे. या आंदोलनाला शेतकरी अरुण अवताडे, नवनाथ शिंदे, जगन्नाथ गायकवाड,बिरु शिंदे, हिदायत मुजावर,चांद शेख प्रहार जनशक्ती पक्षाचे जिल्हा सरचिटणीस श्रीपाद पाटील जिल्हा उपाध्यक्ष सिदराया माळी, मंगळवेढा तालुका अध्यक्ष समाधान हेंबाडे, तालुका उपाध्यक्ष रोहिदास कांबळे, राकेश पाटील, तालुका संपर्क प्रमुख शकील खाटीक, अनिल धोडमिसे, संभाजी गोसावी, सर्जेराव पाराध्ये हजर होते









