वृत्तसंस्था/ सेंट लुईस, अमेरिका
ग्रँडमास्टर आर. प्रज्ञानंदला सेंट लुईस रॅपिड आणि ब्लिट्झ स्पर्धेत पहिल्या दिवसाच्या अखेरीस गुणतालिकेत तळाशी राहावे लागले असून दोनदा विजयी स्थितीत असूनही त्याचा फायदा उठविण्यात अपयशी ठरल्याचा परिणाम त्याला भोगावा लागला आहे.
अरोनिनानविऊद्ध काळ्या सोंगाट्या घेऊन खेळताना सामना बरोबरीत सोडवून भारतीय खेळाडूने सकारात्मक सुऊवात केली. परंतु नंतर फ्रान्सच्या मॅक्सिम वॅचियर-लॅग्रेव्हविऊद्धच्या सामन्यात अखेर टप्प्यात त्याचा खेळ बिघडला. रॅपिड विभागात आणखी सहा सहा फेऱ्या राहिलेल्या असून मॅक्सिम व्हॅचियर-लॅग्रेव्ह पाच गुणांनी आघाडीवर आहे, तर रशियाचा इयान नेपोम्नियाची आणि लेनियर डोमिंग्वेझ व लेव्हॉन अरोनियन ही अमेरिकी जोडी त्याच्या पाठोपाठ आहेत. या क्षणी प्रज्ञानंद जरी शेवटच्या स्थानावर असला, तरी विजेता निश्चित होण्यापूर्वी ब्लिट्झ गेमच्या 18 फेऱ्यांसह रॅपिडच्या आणखी सहा फेऱ्या बाकी असल्याने त्याला पुनरागमन करण्याची भरपूर संधी आहे.









