वृत्तसंस्था/ सेंट लुईस, अमेरिका
ग्रँड चेस टूरचा भाग असलेल्या सिंकफिल्ड कपच्या सातव्या फेरीत भारतीय ग्रँडमास्टर आर. प्रज्ञानंदने फ्रेंच खेळाडू अलिरेझा फिरोजावर सहज विजय मिळवत संयुक्तपणे आघाडी मिळवली. सलग अनिर्णित सामन्यांनंतर मिळालेल्या दुसऱ्या विजयासह प्रज्ञानंदने अमेरिकेच्या फॅबियानो काऊआनासोबत 4.5 गुणांसह गुणतालिकेत अव्वल स्थान पटकावले आहे.
दुसरीकडे, जागतिक विजेता डी. गुकेशला अमेरिकेच्या वेस्ली सोने पराभूत केले. प्रज्ञानंद आणि काऊआना आघाडीवर असताना लेव्हॉन अॅरोनियन आणि वेस्ली सो आता प्रत्येकी चार गुणांसह तिसऱ्या स्थानावर आहेत तर मॅक्सिम वाचियर-लाग्रेव्ह, पोलंडचा दुडा जान-क्रिज्झटॉफ आणि अमेरिकेचा सॅम्युअल सेव्हियन हे पन्नास टक्के गुणांसह संयुक्तपणे पाचव्या स्थानावर आहेत.
गुकेश आणि अलिरेझा प्रत्येकी तीन गुणांसह गुणतालिकेत पुढच्या स्थानावर आहेत आणि नोदिरबेक अब्दुसत्तोरोव्ह फक्त 1.5 गुणांसह शेवटच्या स्थानावर राहील असे दिसते. गेल्या दोन फेऱ्यांमध्ये एकही निर्णायक सामना न झाल्याने काहीशी मरगळ आली होती. परंतु 10 खेळाडूंच्या आणि 3,75,000 अमेरिकन डॉलर्स बक्षीस रकमेच्या या स्पर्धेतील सातव्या फेरीत पाचपैकी तीन निर्णायक सामने झाले.
अलिरेझा आणि गुकेशव्यतिरिक्त नोदिरबेकने दुडाच्या हातून स्पर्धेतील आपला चौथा सामना गमावला आणि नशिबाने त्याला साथ दिली नाही. प्रज्ञानंदने अलिरेझावर मात केली. अलिरेझाने सुऊवातीनंतर त्याच्या स्थानाविषयी अतिआत्मविश्वास बाळगला. सिसिलियनच्या विऊद्ध रोसोलिमो हे एक शक्तिशाली शस्त्र म्हणून ओळखले जाते. परंतु अलिरेझा मधल्या टप्प्यातील खेळाच्या सुऊवातीपासूनच चुकला. प्रज्ञानंदने योग्य वेळी योग्य चाली शोधल्या आणि आक्रमण करून पुढाकार घेतला. अलिरेझा काही रणनीतिक उपाय शोधत राहिला, जे कधीच यशस्वी झाले नाहीत आणि गमावलेल्या शेवटच्या टप्प्यात केलेली चूक त्याला आणखी महागात पडली. हा सामना फक्त 27 चालींमध्ये संपला.
गुकेशने काळ्या रंगाच्या सोंगाट्या घेऊन खेळताना बर्लिन डिफेन्सचा वापर केला आणि वेस्लीने पारंपरिक एंडगेमचा अवलंब न करता अनुकूलता मिळविण्याचा प्रयत्न करण्याचा निर्णय घेतला. सुऊवातीचा खेळ वेस्लीला थोडासा अनुकूल राहिला. पुढे गुकेशने हल्ला चढविला. पण त्याला राणी गमवावी लागली आणि त्यानंतर लगेच सामना संपुष्टात आला.









