प्रतिनिधी/ सेंट लुईस, अमेरिका
सिंकफिल्ड कपच्या पाचव्या फेरीत ग्रँडमास्टर आर. प्रज्ञानंदाने मॅक्सिम वाचियर-लाग्रेव्हशी सहज आणि जलद बरोबरी साधली, तर विश्वविजेता डी. गुकेशने येथे दुडा जान-क्रिज्स्टॉफसोबत गुण विभागून घेण्यापूर्वी चिंताग्रस्त क्षणांचा सामना केला. या दिवशी सर्व पाच सामने अनिर्णित राहिले. मात्र अमेरिकेच्या फॅबियानो काऊआनाने सहकारी वेस्ली सोसोबतचा सामना बरोबरीत सोडविल्यानंतर 3.5 गुणांसह आपली आघाडी कायम ठेवली आहे.
इतर सामन्यांमध्ये अमेरिकेच्या सॅम्युअल सेव्हियनने आपली उत्कृष्ट कामगिरी सुरू ठेवली आणि उझबेकिस्तानच्या नोदिरबेक अब्दुसत्तोरोव्हशी बरोबरी साधली, तर त्याच देशाच्या लेव्हॉन अॅtरोनियनने फ्रेंच खेळाडू अलिरेझा फिरोजाशी बरोबरी साधली. ग्रँड चेस टूरचा भाग असलेली ही नऊ फेऱ्यांची स्पर्धा मध्यास पोहोचलेली असताना काऊआनानंतर प्रज्ञानंद आणि आरोनियन विसावलेले आहेत, तर गुकेश, फिरोजा, वेस्ली, सेव्हियन आणि वाचियर-लाग्रेव्ह हे पाच खेळाडू प्रत्येकी 2.5 गुणांसह चौथ्या स्थानावर आहेत. दुडा दोन गुणांसह त्यांच्याहून मागे नाही आणि एका गुणासह अब्दुसत्तोरोव्ह तळाशी आहे.
वाचियर-लाग्रेव्हच्या रोसोलिमो सिसिलियन पद्धतीने जराही अडचणी सादर न केल्यामुळे प्रज्ञानंदला त्याच्या काळ्या सोंगाट्यांसह खेळताना फारसे काही करावे लागले नाही. सामना मध्यास पोहोचल्यावर फ्रेंच खेळाडूने कोणताही धोका न पत्करण्याचा निर्णय घेतला आणि फक्त 26 चालींमध्ये सामना बरोबरीत सोडविला. दुसरीकडे, काळ्या सोंगाट्यांसह खेळताना गुकेशने ‘क्वीन पॉन’ गेमचा वापर केला. सहज बरोबरीच्या स्थानी आल्यानंतर भारतीय खेळाडूने त्याच्या नेहमीच्या पद्धतीने गुंतागुंत निर्माण करण्यासाठी प्रयत्न केले, परंतु ते जवळजवळ उलटले.
कारण दुडाने काही धूर्त युक्त्या वापरला, ज्यामुळे संगणकानुसार तो स्पष्टपणे चांगले स्थान मिळवू शकला. तथापि, खेळाच्या मधल्या टप्प्यात झालेल्या चुका पोलिश ग्रँडमास्टरला महागात पडल्या. कारण गुकेशने त्याचा फायदा घेऊन पांढऱ्या सोगाट्यांनी घेतलेल्या पुढाकाराला निक्रिय केले आणि अखेर हा सामना बरोबरीत सोडविला. सदर खेळ 45 चाली इतका चालला. स्पर्धेतील एकमेव विश्रांतीच्या दिवसानंतर खेळाडू पुन्हा रिंगणात उतरतील आणि काऊआना आणि सध्याच्या क्रमवारीत आठव्या स्थानावर असलेल्या खेळाडूच्या दरम्यान फक्त एका गुणाचा फरक असल्याने एक रोमांचक शेवट पाहायला मिळू शकतो.









