वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
पोलंडमध्ये झालेल्या पॅराकॅनोईंग विश्वचषक स्पर्धेत भारताची पॅरा कॅनोई खेळाडू प्राची यादवने महिलांच्या व्हीएल-2 विभागात 200 मी. कॅनोईंग प्रकारात कांस्यपदक मिळविले.
महिलांच्या व्हीएल-2 200 मी. कॅनोई प्रकारात ऑस्ट्रेलियाच्या सुसान सिपेलने 1 मिनिट, 01.54 सेकंदाचा अवधी घेत सुवर्णपदक, कॅनडाच्या हेनेसीने 1 मिनिट, 01.58 सेकंदाचा अवधी घेत रौप्यपदक तर भारताच्या प्राची यादवने 1 मिनिट, 0.4.71 सेकंदाचा अवधी घेत कांस्यपदक मिळविले. ही स्पर्धा 26 मे पासून सुरू झाली असून रविवारी ती समाप्त झाली. या स्पर्धेत भारताचा मनिष कौरव आणि मनजीत सिंग यांनी अनुक्रमे केएल-3 200 मी. आणि व्हीएल-2 200 मी. प्रकारात अंतिम फेरी गाठली होती.









