वार्ताहर /नंदगड
अयोध्या येथे झालेल्या श्रीराम मूर्ती प्रतिष्ठापना व मंदिर उद्घाटन समारंभाच्या निमित्ताने झुंजवाड (के. एन.) ता. खानापूर येथे ही प्रभू राम व हनुमानच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. हा कार्यक्रम कलमेश्वर मंदिरासमोर पार पडला. सुरुवातीला कलमेश्वर पिंडीचे पूजन करण्यात आले. त्यानंतर प्रभू राम व हनुमानच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. यावेळी उपस्थित महिलांनी रामाच्या प्रतिमेला आरती ओवाळली. यावेळी आबालवृद्ध व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. सायंकाळी रामावर आधारित गायन व भजन पार पडले. या कार्यक्रमामुळे गावात राममय वातावरण पसरले होते. गावातील रामलिंगेश्वर, विठ्ठल रखुमाई व हनुमान मंदिरातही अभिषेक, पूजा अर्चा करण्यात आली. त्यानंतर रामावर आधारित अभंग, गायन, आरती करण्यात आली. कल्लाप्पा भातकांडे यांनी कलिंगडमध्ये साकारलेली राममूर्ती सर्वांना पाहण्यासाठी ठेवली होती.









