प्रतिनिधी / बेळगाव
बेळगाव दक्षिण विधानसभा मतदारसंघातून काँग्रेसच्या अधिकृत उमेदवार प्रभावती मास्तमर्डी (चावडी) यांनी बुधवारी शक्तिप्रदर्शनाने आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. बुधवारी बेळगाव दक्षिण मतदारसंघाच्या काँग्रेस पक्षाच्या अधिकृत उमेदवार प्रभावती मास्तमर्डी (चावडी) यांनी तहसीलदार यांच्याकडे अर्ज दाखल केला. यावेळी केपीसीसी जनरल सेक्रेटरी, ब्लॉक अध्यक्ष, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.









