वेलिंग्टन :
न्युझीलंडच्या रिवर्टन किनाऱ्यावर मंगळवारी भूकंपाचे शक्तिशाली धक्के जाणवले आहेत. युनायटेड स्टेट्स जियोलॉजिकल सर्वेनुसार या धक्क्यांची तीव्रता रिश्टर स्केलवर 6.8 इतकी होती. भूकंपाचे केंद्र साउथ आयलँडमध्ये 10 किलोमीटर खोलवर होता. भूकंपानंतर त्सुनामीचा धोका निर्माण होऊ शकतो याचे अध्ययन केले जात असल्याचे न्युझीलंडच्या आपत्कालीन व्यवस्थापन संस्थेने सांगितले आहे.









