निपाणी तालुक्यात 3 सप्टेंबर रोजी सकाळी 10 ते सायंकाळी 5.30 या वेळेत वीजपुरवठा खंडित करण्यात येणार असल्याचे हेस्कॉमतर्फे कळविण्यात आले होते. विद्युत केंद्रांमध्ये होणाऱ्या त्रैमासिक दुरुस्ती व देखभालीच्या कामांकरता हा वीज पुरवठा खंडित होणार होता. मात्र टीईटी परीक्षा रविवारी असल्याने वीजपुरवठा सुरळीतपणे सुरू राहणार आहे. शहर व ग्रामीण भागात वीज कोठेही खंडित करण्यात येणार नाही, अशी माहिती निपाणी हेस्कॉमचे सहाय्यक कार्यकारी अभियंता अक्षय चौगुले यांनी दिली.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव









