बेळगाव :
दुरुस्तीच्या कारणास्तव सदाशिवनगर व होनगा उपकेंद्र मार्गावरील गावांमध्ये रविवार दि. 23 रोजी सकाळी 9 ते दुपारी 4 पर्यंत वीजपुरवठा खंडित होणार असल्याचे हेस्कॉम ग्रामीण विभागाने कळविले आहे. हिंडलगा, कंग्राळी खुर्द, अलतगा, आंबेवाडी, बैलूर, जुमनाळ, हेग्गेरी, केंचानट्टी, बेन्नाळी, दासरवाडी, जोग्यानट्टी, भुतरामहट्टी, बंबरगा, सिद्धगंगा ऑईल मिल, तुळजा अलॉईज, हत्तरकी फिड्स, विनायक स्टील इंडस्ट्रीज, हर्षोद्भव, जी. होसूर, घुग्रेनट्टी, गुडिहाळ, उक्कड, वंटमुरी, माशानट्टी, हलभावी, बोमनट्टी, वीरभावी, जुने व नवे होसूर, सुतगट्टी, होनगा, देवगिरी या गावांचा वीजपुरवठा खंडित होणार आहे.









