Power supply may be interrupted for the next two days
दिनांक 30/11/22 व 01/12/22 या दोन दिवसात महाराष्ट्र विद्युत वाहीनीत बदल करण्याचे काम करण्यात येणार आहे. त्यामुळे दोन दिवसात काम चालू असतानाच लाईट जाण्याची शक्यता आहे . महापारेषण कंपनी यांच्याद्वारे ४०० केव्ही कोल्हापूर वाहिनीची तारा बदलण्याकरिता २२० केव्ही तळंगडे ते सावंतवाडी व तळंगडे ते बिर्डी वाहिनी बंद करण्यात येणार आहे .महाराष्ट्र विद्युत मंडळाने जाहिरातीच्या माध्यमातून ग्राहकांना तसेच व्यापारी संघालाही दिलेली आहे. वीज ग्राहकांना सुरळीत वीजपुरवठा देण्याकरिता महावितरण सर्वोतोपरी प्रयत्नशील राहील . परंतु जर वाहिन्यांत काही कारणास्तव बिघाड झाल्यास तर १ तासाचे भारनियमन करण्यात येईल .
सावंतवाडी / प्रतिनिधी









