बेळगाव :
हेस्कॉमच्या कणबर्गी उपकेंद्रात तातडीची दुरुस्ती करण्यात येणार असल्याने रविवार दि. 15 रोजी सकाळी 9 ते दुपारी 4 पर्यंत काही गावांचा वीजपुरवठा खंडित करण्यात येणार असल्याचे हेस्कॉमने कळविले आहे. मुचंडी, अष्टे, कॅम्पबेल, मारिहाळ, करडीगुद्दी, पंतबाळेकुंद्री, बाळेकुंद्री, होनियाळ, माविनकट्टी, तारिहाळ, चंदनहोसूर, एमईएस, सांबरा, मुतगा, सुळेभावी, पंतनगर, मोदगा, यद्दलभावीहट्टी, खणगाव, चंदूर, चंदगड, गणिकोप्प, गुंजेनट्टी, केदनूर, मण्णिकेरी, हंदिगनूर, चलवेनहट्टी, म्हाळेनहट्टी, अतिवाड, बोडकेनहट्टी, कुरिहाळ, कट्टणभावी, निंग्यानहट्टी, गुरामहट्टी, जुने इदलहोंड, शिवापूर, परशानहट्टी, दासरवाडी, केंचानट्टी, सोनट्टी, काकती, कंग्राळी बुद्रुक, बैलूर, हेग्गेरी, हुल्यानूर, बुड्य्रानूर, धरणट्टी, भरणट्टी, गौंडवाड, कडोली, अगसगा व जाफरवाडी या गावांचा वीजपुरवठा खंडित होणार आहे.









