प्रतिनिधी/ बेळगाव
होनगा येथील 33 केव्ही उपकेंद्रामध्ये दुरुस्तीचे काम केले जाणार असल्याने रविवार दि. 5 रोजी सकाळी 9 ते सायंकाळी 6 यावेळेत वीजपुरवठा खंडित केला जाणार आहे. कंग्राळी बुद्रुक, न्यू वैभवनगर, गौंडवाड, बेन्नाळी, भुतरामहट्टी, बंबरगा, होनगा यासह परिसरात वीजपुरवठा खंडित केला जाणार असल्याची माहिती देण्यात आली आहे.









