सावंतवाडी /प्रतिनिधी
सावंतवाडी शहरातील खासकिलवाडा जोग कॉम्प्लेक्स समोरील आंबा व पोफळीचे झाड आज कोसळलेल्या मान्सूनपूर्व पावसामुळे तेथील हनुमान मंदिर आणि विद्युत तारांवर पडून मोठे नुकसान झाले.त्यामुळे त्या भागातील विद्युत पुरवठा खंडित झाला आहे.या परिसरातील रस्त्यावर मोठी वर्दळ असते. परंतु सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. त्यामुळे महावितरणने लवकरात लवकर ती झाडे हटवून विद्युत पुरवठा सुरळीत करावा अशी मागणी तेथील रहिवाशांनी केली आहे
Previous Articleसोन्याच्या दरवाढीचा वेग मंदावला
Next Article रोहिणीच्या उंबरठ्यावर खरीप तयारी









