प्रतिनिधी/ बेळगाव
शहरासह विविध भागात रविवारी सकाळी 9 ते दुपारी 4 पर्यंत वीजपुरवठा खंडित होणार असल्याचे हेस्कॉमने यापूर्वी कळविले आहे. मात्र यामध्ये आता आणखी काही भागात वीजपुरवठा खंडित होणार असून यासंबंधीचे पत्रक हेस्कॉमने शनिवार दि. 16 रोजी प्रसिद्धीस दिले आहे.
टिळकवाडी, हिंदवाडी, जक्कीनहोंड, पाटील गल्ली, एमईएस, कॅन्टोन्मेंट, मारुती गल्ली, नानावाडी, शहापूर व कपिलेश्वर परिसरात वीजपुरवठा खंडित होणार आहे.









