Samarjeet Singh Ghatge News : राष्ट्रवादीचे नेते हसन मुश्रीफांना मंत्रिपद मिळाल्यानंतर समरजितसिंह घाटगे नाराज झाले आहेत. गेले दोन ते तीन दिवस नॉटरिचेबल असणारे घाटगे आज आपली भूमिका स्पष्ट करणार आहेत. आज कागलमध्ये समरजीतसिंह गटाचा मेळावा आहे. या मेळाव्यात ते भूमिका स्पष्ट करणार आहेत.
कागलमध्ये ठिक-ठिकाणी होर्डिंग लागले आहेत. ज्यावर आमचा नेता, आमचा स्वाभिमान, स्वच्छ चारित्रसंपन्न निष्कलंक,आदरणीय राजे तुम्ही बांधाल ते तोरण , तुम्ही ठरवाल ते धोरण अशा आशयाचे बॅनर लागले आहेत. याचबरोबर विधानसभेचं चित्र देखील काढण्यात आलं आहे. 2024 च्या निवडणुकीत कागलमध्ये नेमकं काय होणार असा प्रश्न सर्वसामान्यांना पडला आहे.
दरम्यान, कागल तालुक्यात पक्षीय राजकारण चालत नाही. गटा-तटाचं राजकारण चालतं.राजे जी भूमिका घेतील त्यांना आमचा पाठिंबा असल्य़ाची भावना कार्यकर्त्यांनी व्यक्त केली आहे.तर भविष्यात त्यांना मंत्रिपदाची संधी मिळेल, त्यामुळे ते निर्णय बदलतील असं वाटतं नाही असं वाटतयं, पण तरीही ते जो निर्णय घेतील त्याला आमचा पाठिंबा असल्याचेही कार्यकर्त्यांचे म्हणणे आहे.








