बेळगाव / प्रतिनिधी
मच्छे येथे काही भागात मुख्य विधुत वहिनी दुरुस्ती असल्यामुळे शनिवारी वीजपुरवठा खंडित करण्यात येणार होता. पुढील पाच आठवड्यांसाठी दर शनिवारी वीजपुरवठा बंद करण्यात येणार आहे. एलसी शेड्यूल एक किंवा दोन आठवड्यांपर्यंत वाढू शकते,अशी माहिती हेस्कॉमच्या वतीने देण्यात आली आहे.
त्यासाठी सदरचे काम हे युद्धपातळीवर घेण्यात आले असून शनिवार दिनांक 04 पासून या कामाला सुरुवात होणार आहे. यासाठीमच्छे परिसरातील अर्धा भाग येथील काही फिडर विद्युत पुरवठा बंद करण्यात येणार आहे. यामध्ये मच्छे येथील संभाजी नगर औद्योगिक वसाहत मधील काही भाग बंद करण्यात येईल. रविवारी वीज पुरवठा सुरळीत असणार आहे.









