वृत्तसंस्था / माद्रीद
येथे सुरू असलेल्या माद्रीद मास्टर्स खुल्या पुरुष आणि महिलांच्या आंतरराष्ट्रीय टेनिस स्पर्धेत अचानक विद्युतप्रवाह खंडीत झाल्याने सोमवारचे सर्व सामने तहकुब करावे लागले. टेनिस स्पर्धेत विद्युतप्रवाहाचा अडथळा येण्याची ही पहिलीच वेळ आहे.
सोमवारी पुरुष एकेरीच्या डिमीट्रोव्ह आणि फर्नेली यांच्यात सामना खेळविला जात होता. या सामन्यात डिमीट्रोव्ह 6-4, 5-4 असा आघाडीवर असताना अचानक विद्युतप्रवाह खंडित झाला. स्पर्धा आयोजकांनी विद्युतप्रवाह सुरळीत करण्यासाठी प्रयत्न केले. पण बिघाड अधिक असल्याने हे सामने रद्द करावे लागले. महिलांचे सामने आता लांबणीवर टाकण्यात आले आहेत.









