बेळगाव : बेळगाव शहरासह उपनगराला मागील चार दिवसांपासून पावसाने झोडपले. सोसाट्याच्या वाऱ्यासह सुरू असलेल्या पावसामुळे अनेक ठिकाणी झाडे कोसळली. रविवारी सकाळी किल्ला येथे झाडाच्या फांद्या कोसळून वीजवाहिन्यांचे नुकसान झाले आहे. त्यामुळे काही काळ वीजपुरवठा बंद करावा लागला. रस्त्याशेजारील एका झाडाच्या फांद्या मोडून वीजवाहिन्यांवर कोसळल्या. त्यामुळे वीजवाहिन्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. किल्ला परिसरात काही काळ वीजपुरवठा बंद करण्यात आला. शहरात दररोज झाडे अथवा फांद्या कोसळून वीजवाहिन्यांचे नुकसान होत आहे. रविवारी अशाच प्रकारे झाडाच्या फांद्या कोसळल्याने मुख्य वाहिनी बंद करावी लागली. या परिसरात दिवसभर दुरुस्तीचे काम सुरू होते.
Previous Articleमध्यवर्ती गणेशोत्सव महामंडळ शहापूर विभागाची पूर्वतयारी बैठक
Next Article बैठ्या विक्रेत्यांकडून मनमानी पद्धतीने भूभाडे वसुली
Tarun Bharat Portal
Amit Kulkarni a versatile content writer, scriptwriter, and content producer at Tarun Bharat Media. Specializes in sports news, local news entertainment, national news and astrology content. His captivating storytelling and deep industry knowledge make him an expert in crafting engaging narratives.









